जावेद शेख भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती च्या वतीने ग्राहक आरोग्य जागरुकता मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड दुकानांची पहाणी करण्यात आली. हि सर्व माहिती प्रवीण उमाप, सहा. आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्याकडे देण्यात आली.
शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड दुकानांची पहाणी करण्यात आली. यात शहरातील ३३ खाद्य पदार्थ विकणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या दुकानांची पहाणी केली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. निम्यापेक्षा कमी हॉटेल व्यावसायिकांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (FSSAI) परवाना नाही. काही हॉटेल व्यवसायिक तर चक्क एक्स्पायरी झालेले साहित्याचा वापर पदार्थ बनवण्यासाठी करतांना आढळून आले. बहुतांश ठिकाणी ग्राहकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. चायनीज, फास्ट फूड बनवण्यासाठी लागणारे सॉसवर कंपनीची सॉस तयार करण्याची आणि अंतिम वापराची तारीख नव्हती. किचन, स्वयंपाक घरात अस्वच्छता असून कूक, स्वयंपाकी तसेच वेटर हातात ग्लव्ज आणि डोक्यावर टोपीचा वापर करत नाही. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती कडून मोहिमे अंतर्गत जमा करण्यात आलेली माहिती सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, चंद्रपूर यांचेकडे देण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहक आरोग्य जागरुकता ही मोहिम ग्राहकांचे आरोग्य खाद्य पदार्थांमुळे बिघडू नये, त्यांचे मानवी जीवनावर वाईट परिणाम होऊ नये हा उद्देश ठेऊन राबविण्यात येत आहे. यात शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड दुकानदारांना एकत्रीत आणुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मार्गदर्शन कार्यक्रम भद्रावती येथेच आयोजित होणार असून या कार्यक्रमास टाटा कँन्सर केअर प्रोग्रामचे डॉक्टर, अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहे. भविष्यात ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या कोणत्याही खाद्य पदार्थांमुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य आहे. या कार्यात शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत भद्रावती कडून करण्यात आले आहे. यावेळी प्रवीण चिमूरकर, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,चंद्रपूर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, करूणा मोघे आणि शिला आगलावे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment