Ads

तहसील कार्यालय सिंदेवाही येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा , हजारो संख्येने नागरिकांची उपस्थिती

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सिंदेवाही तहसील कार्यालयात पार पडला. सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार मंगेश तुमराम, रंजीत देशमुख, वहाने, तालुका धान्य पुरवठा निरीक्षक अधिकारी लोखंडे, पोलीस निरीक्षक राठोड,पोलीस उपनिरीक्षक, नगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी व विविध खात्यांचे अधिकारी,लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
Republic Day celebrated with great enthusiasm at Tehsil Office Sindewahi, thousands of citizens present
सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक आणि देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये आणि सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारची योजनेची माहिती मिळेल याकरता "अग्रिस्टॅक" ची नाटिका महसूल कर्मचारी तलाठी तसेच कोतवाल यांनी सादर केली या नाट्याने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचालन आणि देशभक्तिपर गीते यामुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले त्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
सिंदेवाही तहसीलदार पानमंद यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि आजच्या विद्यार्थ्यांनी देशासाठी कर्तव्यभावनेने काम करण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून पांढरबडे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र प्राचार्य, सिंदेवाही संवर्ग विकास अधिकारी मोरे साहेब,प्राचार्य डहारे सर, प्राचार्य यादव मॅडम, नायब तहसीलदार वहाने हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार देशमुख यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर मंगेश तुमराम नायब तहसीलदार सिंदेवाही यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment