जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
संपूर्ण खाटीक संघटना यांनी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनातून सबंधित प्रशासनाला विनंती करून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा एका निवेदनातून प्रशासनाला दिला आहे की! भद्रावती शहराला धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळाचा वारसा लाभलेला आहे. ग्रामपंचाय
त कालावधी पासून भद्रावतीत एका विशिष्ट ठिकाणी बकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून मांस विक्रीस परवानगी असायची.
मात्र आता भद्रावतीत नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून आरोग्य विषयक सर्व नियमांचे उल्लंघन, करून कोणी कुठेही कसेही मांस विक्री करीत आहे. उघडयावर रक्तरंजीत मांसांचे लचके लावुन दुकाने हिंसक वृत्तीत वाढ होत आहे. चिकन, मटन व मच्छीचे दुर्गंधीयुक्त मांस, पाणी व पिसे उघडयावर व रस्त्यावर फेकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीमुळे रोगराईचे वातावरण तयार होत आहे. अलीकडे भद्रावती शहरात डेंगुचा प्रादुर्भाव वाढण्याचे एक कारण असे या निवेदनात नमूद केले आहेत.
या दरम्यान नगर परिषद प्रशासनाचा अलिकडे नागरिकांच्या दृष्टीने अवैद्य मांस विक्रेत्यावर काहीच वचक नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई अथवा दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे भद्रावती शहरात वार्डा वार्डात चिकण, मटनचे दुकाने आहेत. बकऱ्यांचे हिस्से करून मटण विक्री जागोजागी सुरू आहे. यामुळे आमच्या परंपरागत व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे व आमच्या उदरनिर्वाह बिकट प्रश्न निर्माण होउन कुटूंबाचे पालन-पोषण करने कठीण झाले आहे.
शहरात रस्त्यावर काही जणांनी दुकाने थाटल्यामुळे रहदारीचा प्रश्न उभा आहे. रोडवर दिवसाकाठी अपघाताचे प्रमाण वाढले जुना बस स्टॅन्ड परिसरात चिकन, मटण, फिश मार्केटच तयार झाले आहे. परिसरात सर्वत्र घाण व दुर्गधीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यांत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाला यापुर्वीही सामाजिक संघटनांनी कारवाई करण्यासाठी निवेदने व तोंडी सुचना केल्या आहेत, पण काहीही अंमलबजावणी झाली नाही.
या निवेदनातून १५ दिवसांत कारवाई अंमलबजावणी झाली नाही. तर नगर परिषद समोर चिकन, मटण चे दुकान लावुन चिकन, मटण कापून आंदोलन करण्यांत येईल असा ईशारा भद्रावती येथील संपूर्ण खाटीक समाज संघटना यांनी सर्व संबंधित प्रशासनाला दिला आहे.
0 comments:
Post a Comment