जावेद शेख भद्रावती :- भद्रावती सध्या रेती घाटाचे लिलाव बंद आहे त्यामुळे वाळू माफिया यांनी रेती तस्करी चा गोरख धंदा सुरू केलेला आहे ,तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने तहसीलदार राजेशभांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे.
Tractors transporting illegal Sand seized
त्या अंतर्गत गौण खनिजपथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे. यात, मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावी उंबर घाट नाल्यातील अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर नाल्यातून रेती उपसा करत असल्याचीगोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली असता गौण खनिज शोध पथक यांनी उंबरघाट येथे धडक दिली त्यावेळी नाल्यात तीन ट्रॅक्टर होते दोन ट्रॅक्टररेती तस्करपडविण्यात यशस्वी झाले एक ट्रॅक्टर रेती भरलेलेनाल्यात फसल्याने त्याला पकडण्यात आले व गावातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावकऱ्यांच्या मदतीने अवैध रेती भरलेले ट्रॅक्टर काढण्यात आलेबिना नंबर प्लेट नसल्याने विचारणा करण्यात आली, गेले अनेक दिवसापासून भद्रावती तालुक्यातील अवैध रेती ची तस्करी करणाऱ्यां वाळू माफियांनीउच्छाद मांडला आहे एक ब्रास रेती ची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज शोधपथक मंडळ अधिकारी समीर वाटेकर,तलाठी, अनिल दडमल, तलाठी खुशाल मस्के, तलाठी भिसीकर यांनीअवैद्य रेतीची विचारपूस केली असता, सदर हे वाहन मालक मारुती गायकवाड यांचे मालकीचे असूनराहणार वायगाव(कुरेकार )यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या रेती भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसीलकार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले , अवैधरित्यारेती वाहतूक ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले,गौण खनिज शोध पथकाद्वारे एका महिन्यात ट्रॅक्टर व पिकअप व्हॅनचारवाहनावर कारवाई करण्यात आलेली आहेलाखोंचा वर दंड आकारण्यात आलेली आहे,यामुळे अवैद्य रेती तस्कराचे धाबे दणाणलेआहे
0 comments:
Post a Comment