जावेद शेख भद्रावती :-एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 ला तालुक्यातील चिरादेवी गावाजवळील रेल्वे लाईन वर सकाळी उघडकीस आली. सदर मृतक हा 45 ते 50 वयोगटातील असून त्याच्या अंगावर टी-शर्ट असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मार्ग दाखल केला. सदर व्यक्तीची ओळख पटल्यास किंवा परिसरातील या वयोगटातील एखादा इसम बेपत्ता असल्यास त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन भद्रावती पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment