Ads

युवा प्रशिक्षणार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकळे

(तालुका प्रतिनिधी)भद्रावती, जावेद शेख : युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थ्यांनी तहसीलदार भद्रावती आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
Young trainees' appeal to the Chief Minister
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या उपक्रमामुळे आपल्या राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सर्व शिकावू प्रशिक्षणार्थी विविध विभागातील शासकीय कार्यालयातील आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली आहे. सर्व प्रशिक्षणार्थी रुजू सुद्धा झालेले आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना कामाचा अनुभव, मार्गदर्शन शिक्षणाद्वारे मिळत आहे. परंतु शिक्षणाचा कालावधी हा फक्त ०६ महिनेच असून फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी सहा महिन्यानंतर करणार तरी काय? असा प्रश्न सर्व प्रशिक्षणार्थीना पडला आहे. सर्व प्रशिक्षणार्थी पूर्णपणे बेरोजगार होणार असल्याकारणाने चिंता भेडसावत आहे.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच कायमस्वरूपी होतील, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देणे नितांत गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्या अगोदरच्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडकी बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरीत होऊ न देता प्रशिक्षणार्थी युवक युवतींना आहे त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे आणि मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ करून द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तालुका भद्रावती च्या वतीने करण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment