Ads

अवैध कोंबड बाजावर पोलिसांची धाड, सहा आरोपींना अटक

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
कोंबड्यांची झुंजीचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत ६ आरोपी, ५ कोंबडे सह मुद्देमालही जप्त केला आहे.
Police raid illegal cockfighting Game, six accused arrested
आज दिनांक 07/01/2025 पोलीस स्टेशन भद्रावती येथे मुखबीर द्वारे गुप्त खबर मिळाली की मौजा कोंडेगाव तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे अवैधरिता कोंबड्याचे झुंज लावून पैशाची हरजीत ची बाजी लावून जुगार खेळत आहे

अशी खबर मिळाल्याने सदरची माहिती ठाणेदार अमोल काचोरे यांना देऊन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी वीरेंद्र केदारे सोबत सफो महेंद्र बेसरकर पोशी जितेंद्र पराते संतोष कावडे भारत पुसांडे शंकर घुगे यांच्यासह जाऊन धाड टाकली असता धाड मध्ये पोलिसांनी कोंबडे भांडवणाऱ्या सहा जणांना घटना स्थळावर घेराव घालून अटक केली व पाच झुंज लावण्यासाठी कोंबडे कि.2000 रुपये व आरोपीच्या अंग झडतीत 2660 रुपये नगदी असा एकूण 4660 रू च्या मुद्देमाल मिळून आल्याने पोलिस स्टेशन भद्रावती गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment