Ads

बल्लारशा येथे गांजा विक्री करणारा अट्टल गुन्हेगारा ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपुर :-दिनांक ०७/०२/२०२५ रोजी पोउपनि मधुकर सामलवार यांना गोपनिय बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, आरोपी नामे लालचंद केसकर रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारशाह जि. चंद्रपुर हा गांजा अंमली पदार्थाचा व्यवसायीक असुन तो बल्लारपुर येथुन चंद्रपुर येथे गांजा विक्री करीता त्याचे होंडा अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ सी.एल. ५०२५ चे डीक्की मध्ये अवैधरित्या गांजा वाहतुक करणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने बल्लारशा ते चंद्रपूर कडे जाना-या रोड वर चुनाभट्टी बस स्टाप येथे सापळा रचला असता, आरोपी नामे लालचंद केसकर हा अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ सी.एल. ५०२५ ने चंद्रपूर कडे येताना दिसला त्यास अडवुन त्याची एनडीपीस कायद्या अंतर्गत झडती घेतली असता त्याचे मोपेड वाहनाचे डिक्कीत ५ किलो ४७८ ग्रॅम हिरवे कॅनाबिस गांजा वनस्पतीची पाने/फुले/बिया (गांजा) मिळुन आले.
A hardened criminal selling ganja in Ballarsha was arrested, action taken by the local crime branch
आरोपी लालचंद गणेश केसकर, वय-६४ वर्ष, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर, ता. जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन आरोपी हा आपले आर्थीक फायदया करीता त्याचे ताब्यातील होंडा अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ सी.एल. ५०२५ मध्ये मनोव्यापारावर परीणाम करणारे घटक असलेला कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने फुले व बिया अवैधरित्या विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्याचे कृत्य हे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S.Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), अन्वये होत असल्याने आरोपी कडुन एकुन १,८२,००० रूपयांचे मुद्देमाल जप्त करून पोरटे बल्लारशाह येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोस्टे बल्लारशाह करीत आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा / रजनिकांत, पोहवा / चेतन, पोहवा/महंतो, पोशि/प्रशांत, पोशि/प्रफुल, पोशि/१२३९ किशोर वाकाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment