Ads

आनंदवनात मित्र मेळाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई येणार

सादिक थैम वरोरा:पद्मश्री बाबा आमटे यांनी 1949 मध्ये महारोगी सेवा समितीची स्थापना करून नागपूर चंद्रपूर मार्गावर आनंदवन वसविले. या आनंदवनात कुष्ठरोग्यांना सोबत घेत त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. या कुष्ठरोगांच्या आयुष्यातील हरवलेला आनंद मिळवून ते समाधानी रहावे आणि कुष्ठरोग्यांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर व्हावे या उदात्त उद्देशाने त्यांनी आनंदवनात मित्र मेळाव्याचे आयोजन सुरू केले.पुढे या चैतन्यमय सोहळ्याला गत अनेक वर्षापासून आनंदवनाचे चाहते मुकले होते. मात्र यावर्षी आनंदवनाच्या 75 व्या वर्षानिमित्ताने येत्या ८ व ९ फरवरीला आनंदवनात पुन्हा मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आनंदवनातील मित्र मेळाव्याच्या उद्घाटनाला ८ फरवरीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई ,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे हे उपस्थित राहणार आहेत.
आनंद वनाच्या 75 वर्षाच्या विलक्षण प्रवासाचे अवलोकन आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी पुढील 25 वर्षांमध्ये संस्था राबवू इच्छित असणाऱ्या नव्या उपक्रम उपक्रमाचे सादरीकरण करण्याच्या उद्देशाने ८ आणि ९ फरवरीला या मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Supreme Court Justice Bhushan Gawli will come to Anandvan for a friend gathering
मित्र मेळाव्याच्या पहिल्या दिवशी ८ फरवरी रोज शनिवारला सकाळी साडेनऊ वाजता या मेळाव्याचा प्रारंभ होईल. सकाळी दहाच्या सुमारास वृक्षदिंडी सह संस्थेच्या 75 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या चित्र व वस्तू प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शन स्थळांजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात आनंदवनाच्या भविष्यातील प्रस्तावित संस्थात्मक योजनांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते डिजिटल सादरीकरण केले जाणार आहे.
यावेळी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, सहाय्यक सचिव डॉ. प्रकाश आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार आहेत.
आनंदवनच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ,कोटक महिंद्रा बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश आपटे, केपीआयटी टेक्नॉलॉजी पुण्याचे संस्थापक अध्यक्ष रवी पंडित, समाज माध्यम प्रभावक सारंग साठे, सहसंस्थापक श्रीमती पाॅला मॅक्गलीन,अमुक तमुक पाॅटकास्ट आणि समाज माध्यम प्रभावक ओंकार जाधव, सहसंस्थापक शार्दुल कदम, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक दीग्पाल लांजेकर, निवृत्त सनदी अधिकारी जी नारायणस्वामी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी त्याग समर्पण स्मारकाचे अनावरण, संस्थेच्या 75 वर्षाच्या प्रवासाचे चित्ररूप व वास्तुरूप प्रदर्शन, संस्थेच्या नव्या पिढीतील पूर्ण वेळ कार्यकर्त्यांशी संवाद, मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील संस्थेच्या स्नेही मंडळाकडून विनोदी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण, संस्थेच्या कुष्ठमुक्त दिव्यांग आणि आदिवासी कलाकारांतर्फे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाईल.
दुसऱ्या दिवशी 9 फरवरी रोज रविवारला बाबा आमटे यांची पुण्यतिथी आहे. वरोरा मार्डा मार्गावरील धनलक्ष्मी नगरीत तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सकाळी दहा वाजता आगमन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मित्रमेळावाचा समारोप होईल . यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत हेही उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी अनाम कुष्ठरोगी बांधवांच्या स्मरणशिलेचे अनावरण,मानव प्राणी आणि पर्यावरण हक्कासाठी विशेष प्रतिज्ञेच्या माध्यमातून बाबा आमटेंना अनोखी श्रद्धांजली, संस्थेतील कुष्ठमुक्त दिव्यांग रहिवासी आणि अतिथींचा कृतज्ञता आदान प्रदान सोहळा, दिव्यांग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नती आणि पर्यावरण संवर्धनासाठी संस्था पुढील 25 वर्षाच्या प्रवासात राबवू इच्छित असलेल्या उपक्रमांचे अतिथींच्या हस्ते उद्घाटन होईल.ज्यातून आनंदवनला आरोग्य,शिक्षण, कौशल्य,विकास आणि पर्यावरणाची राजधानी म्हणून स्थापित करण्याचे बाबा आमटे यांचे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकेल.
यावेळी आमंत्रित निवडक अतिथी आपले मनोगत व्यक्त करतील. या मित्रमेळाव्याची सांगता दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment