Ads

कुप्पम आंध्रप्रदेश येथील राष्ट्रीय विज्ञान प्रशिक्षणात चंद्रपूरच्या शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग.

राजुरा:- राज्य विज्ञान शिक्षक संस्था, नागपूर, महाराष्ट्र शासन इन्फोसिस (बंगलोर) आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन,कुप्पम(आंध्रप्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ते 31 जानेवारी 2025 ला"कन्स्ट्रक्टीविझम् इन हँड्स-ऑन टीचिंग वर्कशॉप" Constructivism in Hands-on Teaching Workshop"हे निवासी प्रशिक्षण पार पडले.विज्ञान आणि गणित विषयांसाठी रचनावाद वर असलेल्या या कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान - गणित विषयाच्या अकरा शिक्षकांनी उत्सफुर्त सहभाग घेतला.
Spontaneous participation of Chandrapur teachers in the National Science Training in Kuppam, Andhra Pradesh.
"कन्स्ट्रक्टीविझम् इन हँड्स-ऑन टीचिंग वर्कशॉप" या चार दिवसीय प्रशिक्षणात कृती-आधारित शिक्षणावर भर देण्यात आला. आंध्रप्रदेशच्या डोंगराळ भागात १७५ एकर नैसर्गिक वातावरण राखून तयार केलेल्या प्रयोगशाळांमध्ये हे प्रशिक्षण पार पडले. येथे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित विषयांवरील प्रयोग प्रत्यक्षरित्या करून दाखविण्यात आले. विशेषतः विद्यार्थी हा पूर्वानुभावाच्या आधारे आपल्या ज्ञानाची निर्मिती करतो याची सविस्तर माहिती प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली. रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्राद्वारे पाण्याचा पुनर्वापर करून जैवविविधतेला कसे समृद्ध करता येते,हे कॅम्पस मध्ये पहावयास मिळाले. या चमू मध्ये विदर्भातील सुमारे 110 शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांचा अशा आंतरराज्यीय प्रशिक्षणात सहभाग हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली. DIET चे प्राचार्य राजकुमार हिवारे , धनराज येलमूलवार यांच्या मार्गदर्शनात डायट प्रतिनिधी मुसा शेख, राजुरा यांचे सह चंद्रपूर जिल्ह्यातून अंकित मुंगले, राजेंद्र सहारे, सुनील पिंपळकर, शिल्पा ठाकरे, अनिरुद्ध शिवणकर, प्रफुल धंगेकर, सुनीता भसारकर, दुर्भाष खोब्रागडे, पंकज चीमरालवार आणि अनिल वटके यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment