Ads

लाचखोर कृषी सहायकला अटक: शेतकऱ्याकडून स्प्रे पंप करीत एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

जावेद शेख भद्रावती :- सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मौजा माजरी कॉलरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन शेतकरी आहेत. त्यांची मौजा नंदोरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथे शेती असुन त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे महाडिबीटी योजनेअंतर्गत शेतमाल फवारणीकरीता बॅटरी स्प्रे पंप मिळणेकरीता सप्टेंबर / २०२४ मध्ये अर्ज केला होता. त्यानुसार तकारदार यांना फवारणी स्प्रे पंप सप्टेंबर/२०२४ मध्येच मंजुर करण्यात आलेला होता. त्यानुसार दिनांक ०७/१०/२०२४ रोजी मौजा चंदनखेडा, ता. भद्रावती जि. चंद्रपूर येथे कृषी विभागामार्फत स्प्रेपंप वाटप झाले होते, परंतु तक्रारदार हे बाहेरगावी असल्याने स्प्रे पंप घेवू शकले नाही.
Bribery agricultural assistant arrested: ACB catches him red-handed while taking a bribe of Rs 1,000 from a farmer .
त्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे जावून आलोसे श्री. सरजीव अजाबराव बोरकर, कृषी सहायक यांची भेट घेतली असता कृषी स्प्रे पंप देणेकरीता टाळाटाळ करीत होते. त्यानंतर दिनांक ०३/०२/२०२५ रोजी आलोसे श्री. सरजीव बोरकर यांनी तक्रारदार यांना फोन करून शेतीसाठी उपयोगी असलेले फवारणी पंप देणेकरीता १०००/- रूपयांची मागणी केली होती.

परंतु तक्रारदार यांना आलोसे श्री. बोरकर यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे दिनांक ०३/०२/२०२५ रोजी तक्रार दिली. प्राप्त तकारीवरून आज दिनांक ०४/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र गुरनुले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी/सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी कार्यवाहीदरम्यान आलोसे श्री. सरजीव बोरकर यांनी तक्रारदार यांचे कृषी विभागांतर्गत मंजुर फवारणी पंप देण्याचे कामाकरीता १०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

त्यावरून आज दि. ०४/०२/२०२५ रोजी नंदनवन प्रवेशद्वार, विनायक लेआऊट, वरोरा, जि. चंद्रपूर येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे श्री. सरजीव बोरकर यांनी १०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर व श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. जितेंद गुरनुले, पोशि वैभव गाडगे, पोशि अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि.पुष्पा काचोळे व चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment