Ads

महाराष्ट्र संघाच्या संघ व्यवस्थापक पदी कु. पुर्वा खेरकर यांची निवड.

राजुरा:-भारतीय ऑलिम्पिक संघटना व क्रीडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार द्वारा आयोजित 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा देहरादून उत्तराखंड येथे दिनांक 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महाराष्ट्राचा एथलेटिक संघ तयार झाला असून महाराष्ट्र ऍथलेटिक संघाच्या संघ व्यवस्थापक पदी चंद्रपूर जिल्ह्या ॲथलेटिक संघटनेच्या कोषाध्यक्ष कू. पूर्वा खेरकर हिची निवड करण्यात आली आहे.
Ms. Purva Khedkar was elected as the team manager of the Maharashtra team.
पूर्वा हिच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघ दिनांक 6 फेब्रुवारी रोजी देहरादून येथे उपस्थित होणार आहे. सदर स्पर्धा राष्ट्रीय स्वरूपाचे असून प्रत्येक राज्यातील मानांकित निवड खेळाडू यांची याकरिता निवड झाली आहे. संघाचा स्पर्धा पूर्व सराव बालेवाडी पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सुरू आहे. संघ राष्ट्रीय स्तरावर यशस्वीरित्या सहभागी होऊन महाराष्ट्र करिता अधिकाधिक पदके प्राप्त करतील अशी आशा पूर्वा हिने व्यक्त केली आहे.
राज्य संघाच्या व्यवस्थापक पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघटना अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, सचिव सुरेश अडपेवार, मकरंद खाडे, प्रकाश तुमाने, प्रा. संगीता बांबोडे, रोशन भुजाडे, अनिल ददगाल, डॉ.सुनील डाखोरे, श्रीनिवास जंगम, गिरीश साकुरे, कु. वर्षा कोयचाळे, मयूर खेरकर, स्वप्निल सायंकर, भास्कर फरकाडे, चेतन भजभूजे, विजय भगत, दर्शन मासिरकर, महेश वाढई, निलेश बोधे, प्रियंका मांढरे, सरोज यादव, अविनाश जाधव, श्री रामेश्वर फड, मारुती उरकुडे, सुरेश तूम्मे, नारायण कुडे, श्रीहरी गजक्रांती, नितेश आत्राम तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी आनंद व्यक्त केला असून पूर्वाला पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. पूर्वा ही नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची सक्रिय पदाधिकारी असून तिने क्रिडा क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. तिला पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाची सुद्धा आवड आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment