Ads

वरोऱ्यात रंगणार खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा.

सादिक थैम वरोरा:-स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा(WSF) व लोक शिक्षण संस्था वरोरा
यांचे संयुक्त विद्यमाने स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृती प्रित्यर्थ अखिल भारतीय खासदार चषक पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. 18 /2/ 2025 ते 20 /2 /2025 दरम्यान लोकमान्य महाविद्यालयाचे मैदानावर करण्यात आलेले आहे.
MP Cup All India Volleyball Tournament to be held in Warora.
स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने तयार करण्यात आले असून. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुरुष गटात प्रथम पुरस्कार 1लाख रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख चषक, चतुर्थ पुरस्कार 25 हजार रुपये रोख व चषक तसेच महिला विभागात प्रथम पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख व चषक ,तृतीय पुरस्कार 25000रुपये चषक ,चतुर्थ पुरस्कार 15000 रुपये चषक तसेच इतर वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये बंगाल ,ओरिसा, तेलंगाना ,तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब ,गुजरात व महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले नामांकित पुरुष व महिला संघ सहभागी होत आहे. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता लोकशिक्षण संस्था वरोडाचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील सर यांचे मार्गदर्शनात आयोजन समितीचे अध्यक्ष मानस बाळूभाऊ धानोरकर व वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांचे नेतृत्वात, आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू अहोरात्र परिश्रम घेत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment