सादिक थैम वरोरा : जि.प.उ.प्राथ.शाळा, खेमजई येथे दि.28,29,30 जानेवारी 2025 तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.
हिला दिवस
मंगळवार 28 जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या उद्घाटिका. प्रतिभाताई धानोरकर, खासदार (चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र) आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष करण देवतळे, आमदार (वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र) हे आवर्जून उपस्थित होते. प्रमुख अतिथी मनिषाताई चौधरी (सरपंच खेमजई),कन्हैयालाल जयस्वाल (माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती जि.प.चंद
पूर) चंद्रहास मोरे(उपसरपंच ग्रा.पं.खेमजई),गजानन मुंडकर साहेब (संवर्ग विकास अधिकारी) ज्ञानेश्वर चहारे (गट शिक्षणाधिकारी) कु.श्वेता लांडे(शि.वि.अ.) सागर पाटील (केंप्र शेगाव) संजय बोबडे (केंप्र खांबाडा) अशोक राऊत(केंप्र माढेळी) गिता चिडे (केंप्र वरोरा) प्रणिता नौकरकार (केंप्र येन्सा) चंद्रकांत धकाते (केंप्र वडधा तु.) विजय बरडे (केंप्र साखरा) रवी चंदनखेडे (केंप्र चिकणी) राजू कुशमवार(केंप्र चारगाव) तुकाराम उरकुडे (केंप्र नागरी) प्रमोद गंपावर (सामाजिक कार्यकर्ते),रविंद्र रणदिवे (अध्यक्ष शा.व्य.समिती)यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. उद्घाटनानंतर जि.प.उ.प्राथ.शाळा, खेमजईच्या विद्यार्थ्यांनी सावित्री वंदना नृत्य सादर केले. त्यानंतर 7 बिटांच्या दर्शनी कवायती सादर करण्यात आल्या. पहिल्या दिवशी फक्त वैयक्तिक खेळ घेण्यात आले.विद्यार्थ्यांच्या जेवणानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रहास मोरे,उपसरपंच ग्रा.पं.खेमजई ,उद्घाटक डॉ. अघडते (पशुधन विकास अधिकारी, खेमजई) प्रमुख अतिथी रविंद्र रणदिवे (शा.व्य.स. खेमजई) अर्चना लांडगे (उपाध्यक्षा शा.व्य.स.) रमेश चौधरी (सदस्य ग्रा.प.सदस्य) हे उपस्थित होते. रात्री स्पर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला.
दुसरा दिवस
बुधवार 29 जानेवारी रोजी सकाळी विद्यार्थी तथा शिक्षकांना नाश्ता दिल्यानंतर सर्व सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या.दुपारी जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सांगता करण्यात आली.
तिसरा दिवस
गुरूवार 30 जानेवारी रोजी सकाळी विद्यार्थी तथा शिक्षकांच्या नाश्त्यानंतर फायनल मॅचेस आणि उर्वरित वैयक्तिक खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थी तथा शिक्षकांना शेवटचे सुग्रास जेवण देण्यात आले. शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश चौधरी (सदस्य ग्रा.पं.खेमजई) बक्षीस वितरक डॉ.गंपावार साहेब,चहारे साहेब (गटशिक्षणाधिकारी) घनश्याम येंचलवार साहेब(सचिव ग्रा.पं, खेमजई) नरेशकुमार जयस्वाल (सामाजिक कार्यकर्ते) रविंद्र रणदिवे (अध्यक्ष शा.व्य.समिती) शंकर धोत्रे (अध्यक्ष तं.मु.स. खेमजई) अर्चना लांडगे (उपाध्यक्षा शा.व्य.समिति) हे होते. विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.बक्षीस वितरणासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नरेशकुमार जयस्वाल यांच्या तर्फे बॉटल आणि बिस्किटे वाटप करण्यात आली.
सांस्कृतिक चँपियन बिट -चारगाव ,मैदानी चँपियनशीप
बिट-शेगाव,जनरल चँपियनशीप बिट-शेगाव यांना प्राप्त झाली.शेवटी तालुक्याच्या क्रीडा ध्वजाचे अवतरण करण्यात आले आणि ज्ञानेश्वर चहारे सरांना ध्वज सूपूर्द करण्यात आला.
अशाप्रकारे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने खेमजई गावाच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उत्साहाने हा 25 वर्षांनंतर झालेला सोहळा यशस्वी झाला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे ग्रा.पं.पदाधिकारी तथा सचिव, शा.व्य.स.पदाधिकारी,गुरूदेव सेवा मंडळ,विर बिरसा क्रीडा मंडळ,ग्राम विकास समिती,विकास गृप खेमजई ,महिला बचत गट,माता पालक संघ, शिक्षक पालक संघ तथा सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि अप्रत्यक्ष मदत करणारे दाते, सर्व शिक्षक पंच आणि बक्षीसासाठी मदत करणारे दानशूर दाते यांचेजि.प.उ.प्राथ.शाळा, खेमजईच्या वतीने आणि पं.स. वरोराच्या वतीने लाख लाख आभार.
0 comments:
Post a Comment