चंद्रपुर :-दिनांक ०३/०२/२०२५ रोजी पोउपनि विनोद भुरले व पोलीस स्टाफ अरो पोलीस स्टेशन, रामनगर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, तिन इसम हे घरफोडी केली असुन संशईतरित्या रयतवारी कॉलरी, चंद्रपुर येथे फिरत आहे अशा खबर वरून आरोपी नामे १) राकेश सुब्रहमण्यम सानिपती, वय-३४ वर्ष, धंदा-मजुरी, रा. तेलगु शाळेजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, २) विश्वजीत बिमल सिकदर, वय-३२ वर्ष, धंदा-मजुरी, रा. बंगाली कॉम्प, पाण्याचे टाकीजवळ, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, ३) दिपक राजु भोले, वय-२१ वर्ष, धंदा-मजुरी, रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी पोलीस स्टेशन, भद्रावती तसेच पोलीस स्टेशन, रामनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले.
Local Crime Branch arrests criminals with record for house burglary
त्यावरून नमुद आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी घरफोड्या करून चोरी केलेले सोन्याचे दागीने हे सराफा सोनार नामे मनोज पवार, रा. सराफा लाईन, चंद्रपुर यास विक्री केले असे सांगितले वरून नमुद सराफा दुकानदार यांचेकडुन व इतर आरोपींकडुन सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकुण ३,७१,३००/- रूपयाचा माल जप्त केला आहे. सदर आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापुर, चंद्रपुर शहर येथे चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीताना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोहवा. सतिश अवयरे, नापोशि/संतोष येलपुलवार,, पोशि/गोपीनाथ नरोटे, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment