(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही महसूल विभागाने रेती तस्करांच्या विरोधात एल्गार पुकारला असून याच पार्श्वभूमीवर सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील टेकरी तुकुम या गावाच्या जवळच असलेल्या नाल्यातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी रेती वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती.
सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांच्या आदेशान्वये स्थानिक नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर ट्राली ही विना क्रमांक असलेली रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर सिंदेवाही तहसील कार्यालयात जप्त केले आहे.
अवैध रेती उत्खनननाला आळा घालण्याकरिता सकाळच्या वेळी अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सिंदेवाही नायब तहसिलदार मंगेश तुमराम व तलाठी सुनील गुंजाळ हे 10 फेब्रुवारी रोजी सोमवार सकाळी 8-00 वाजताच्या सुमारास गुंजेवाही जवळील टेकडी तुकुम गावालगत असलेल्या रोडवर सदर अवैध रेतीने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पकडले व ट्रॅक्टर - ट्रालीसिंदेवाही तहसील ला जमा केला. असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे रेती भरलेल्या ट्रॅक्टर वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करावे असा प्रस्ताव पाठवीला आहे. अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली
0 comments:
Post a Comment