Ads

चंद्रपूर शहराची दुर्दशा करणारे महानगरपालिकेतील 'आका' आणि 'आकाच्या आका' विरुद्ध 'जन-संघर्ष' अभियान

चंद्रपुर :-चक्क शंभर कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना पूर्ण झालेली असताना नवीन भुमिगत गटार योजनेकरिता 450 कोटी रुपयांची निविदा काढण्यात येते, 450 कोटी रुपये अंदाजपत्रक असलेले हे काम मर्जीतल्या कंत्राटदाराला दर वाढवून 506 कोटी रुपयांमध्ये देण्यात येते, अनेक काम अपूर्ण ठेवणाऱ्या व कराराचा भंग करणाऱ्या पहिल्या अमृत योजनेच्या कंत्राटदाराची सर्व देयके मंजूर करून त्याला कारवाईतून अभय देण्यात येते व त्याची शिल्लक कामे मनपा स्वतःच्या पैशातून करते , शंभर कोटी रुपयांच्या कचरा संकलनाचे काम सर्वोच्च न्यायालयातून रद्द होते पण निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या विरुद्ध कारवाई होत नाही.
Troublemakers of Chandrapur city
'Aaka' of the Municipal Corporation
And against 'Akachya Aaka'
'Jan Sangharsh' campaign
आम्ही तक्रार केल्यानंतर फाउंटेनच्या कामाची, पाणीपुरवठ्याच्या खाजगीकरणाची तसेच लोकसभेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून काढलेली रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाची 24 कोटी रुपयांची निविदा रद्द होते पण दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आम्ही आजपर्यंत उघडकीस आणलेल्या अनेक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब होऊनही कारवाई का होत नाही ? जिल्हा प्रशासन किंवा शासन झोपले आहे का ? हा आमचा सवाल आहे.
महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरुद्ध विधानसभेत किंवा लोकसभेत (केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील घोटाळ्याबाबत) कोणतेही लोकप्रतिनिधी आवाज का उचलत नाही? महानगरपालिकेची तिजोरी लुटणाऱ्या विरुद्ध शासनाला कारवाई करायला भाग का पडत नाही ? हे सुद्धा गंभीर प्रश्न आहेत.
चंद्रपूर शहराची दुर्दशा होण्यास मनपा प्रशासनातील 'आका' आणि या 'आकां'ना संरक्षण देणारे सरकारमधील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. हेच 'आकाचे आका' आहेत.हे केवळ 'आकां'कडे दुर्लक्षच करत नाही तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही याची काळजी सुद्धा घेतात.
मनपा प्रशासनातील या 'आका' व त्यांना संरक्षण देणाऱ्या 'आकाच्या आका' विरुद्ध जनविकास सेनेतर्फे 'जनसंघर्ष अभियान' सुरू करण्यात येत आहे. उद्या बुधवार 12 फेब्रुवारी 2025 पासून या अभियानाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती मनपाचे माजी नगरसेवक व जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.पत्रकार परिषदेला जनविकास सेनेचेघनश्याम येरगुडे, इमदाद शेख, नितीन बनसोड, कुशाबराव कायरकर,सुभाष पाचभाई,प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, आकाश लोडे, गितेश शेंडे, सतिश घोडमारे, मनीषाताई बोबडे, स्नेहल चौथाले, अरुणा महातळे, मेघा मगरे, अरुणा मांदाडे उपस्थित होते.

मनपाच्या मुजोर अधिकाऱ्यांचा माज उतरवणार

मनपाच्या भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराविरुद्ध आंदोलन करणाऱ्या जनविकास सेनेला मंडप व होर्डिंग साठी मनपा प्रशासनाने परवानगी नाकारली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या वेळेस लावलेल्या अवैध बॅनर बाबत विचारणा केल्यानंतर उपायुक्त खवले यांनी मुजोरीने उत्तर दिले. भाजप कार्यकर्त्याच्या नावाने डमी परवानगी मागितल्यानंतर संबंधित कर्मचारी बोधनकर व नागोसे यांनी एका तासात बॅनर व मंडपाची परवानगी दिली.या बाबतचे पुरावे व ऑडिओ क्लिप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.आंदोलन करणाऱ्या विरुद्ध पोलिसात खोट्या तक्रारी करण्यापर्यंत मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांची मजल गेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माज आला आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना याची लेखी माहिती दिली असुन त्यांनी कारवाई न केल्यास जनविकास सेना मनपा प्रशासनातील मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा माज उतरवण्याचे काम करेल असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment