चंद्रपूर : स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुरला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतून मौज गोमनी नाल्यातून अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याने सापळा रचून रेती सह २ ट्रॅक्टर असा एकूण १६,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी, १२डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली. जप्त केलेल्या ट्रॅक्टरच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
2 tractors illegally excavating and transporting sand seized
१) अरुण श्रीधर मालेकर वय (३९) मालक,२) शैलेश नामदेव तलांडे वय (२४), ड्रायव्हर,३) संदेश मारोती मुसळे वय (२६) ड्रायव्हर,अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूद्ध पो. स्टे. राजुरा अप. क्र. ५६ /२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. सह कलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ सहकलम - १, २, ३ गौण खनिज अधिनियम १९५२, सह कलम १३०(१)/१७७, ५० मो.वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment