चंद्रपूर :-केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने अलिकडेच नविन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 10वी च्या परिक्षा पद्धतील बदल करण्यासंदर्भात आराखडा तयार केला आहे. यामध्ये 10वी च्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाची दखल घेत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाला पत्र पाठवून प्रचलित पद्धतीत बदल करु नये अशी मागणी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने खासदारांच्या मागणी ची दखल घेऊन वरील निर्णणयावर पुनःविचार करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
Central Board of Secondary Education to reconsider 10th class exams
नविन परिक्षा पद्धीत दोन वेळा होणाऱ्या परीक्षा या मार्च व मे महिन्यात होणार आहे. सदर कालावधीत विदर्भासह महाराष्ट्रात उन्हाची दाहकता अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शारिरीक व मानसिक तासाला समोर जावे लागणार आहे. त्यासोबच, शाळांदेखील सदर परिक्षा पदृधीत अडचणी च्या ठरणार आहे. या कारणात्सव खासदार धानोरकर यांनी सदर परीक्षा पद्धतील विरोध करुन एकच परिक्षा सुरु ठेवण्याची मागणी केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा ने खासदार धानोरकर यांची शिफारस मान्य केली असून लवकरच बोर्ड यावर निर्णय घेणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. असे झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना याचा सोयीचे होणार आहे.
About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment