सादिक थैम वरोरा: Crime Newsपोलीस स्टॉप २९ मार्च २०२५ ला पेट्रोलिंग करीत असताना दुचाकीवरून विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली माहितीनुसार चंद्रपूर - नागपूर महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. अवैध रित्या दारू वाहतूक करणारे वाहन थांबबून झडती घेण्यात आली.वाहनांमध्ये विदेशी दारू आढलून आली.विदेशी दारू व ग्रे रंगाची टिव्हीएस ज्यूपिटर दुचाकी वाहन क्रमांक एम एच सी एच ४४२० असा एकूण किंमत ९७,३६० रू चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
आरोपी विनोद नथुजी वेल्हादे,वय २८ वर्ष,समीर आरिफ शेख वय २२ वर्ष,दारासिंग संगतसिंग दुधानी वय २९ वर्ष,तिन्ही रा. कॉलरी वॉर्ड,वरोरा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे दारूबंदी कायद्यानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर कारवाई सपोनी विनोद भुरले,पोउपनी मधुकर सामलवार, सफौ.धनराज करकाडे,पोशी प्रशांत नागोसे,प्रफुल गारघाटे,शशांक बदामवार व सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाने केली आहे.
अवैध दारू विक्रेत्यांना नेमका दारू माल पुरवठा करणारा कोण?
वरोरा शहर व ग्रामीण भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.समाज व सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून युवा वर्ग सुद्धा दारूचे आहारी गेल्याचे दिसून येत आहे.गल्ली बोळात,पान टपरीवर दारू मिळत असल्याचे चित्र आहे.परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून अवैध दारू विक्रेत्यांना दारू माल पुरवठा तर होत नसेल असा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहे.अवैध दारू विक्रेत्यांना नेमका दारू माल कोण पुरवठा करणारा नेमका कोण?असा प्रश्न उपस्थित होत असून संशोधनाचा विषय आहे.
पोलीस विभागांनी दारू पुरवठा करणाऱ्यांचा शोध लावण्याची गरज असून अवैध दारू विक्रीला कायमचा लगाम लावण्याची गरज आहे अशी जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.
0 comments:
Post a Comment