Ads

नागपूर येथे २६, २७ एप्रिल २०२५ रोजी १० वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

चंद्रपुर :-'अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर' तर्फ १० वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे २६, २७ एप्रिल २०२५ रोजी विमलताई देशमुख स्मृति सभागृह, धनवटे नेशनल कॉलेज, कांग्रेस नगर, नागपूर येथे आयोजित आहे. या संमेलनाचे सह आयोजक नागपूर येथील भारतीय मुस्लिम परिषद, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, डॉ. शाहा विचार मंच, छवि पब्लिकेशन्स, राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ हे आहेत.
10th All India Muslim Marathi Literature Conference to be held in Nagpur on 26th and 27th April 2025
या '१० व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आयोजन समितीने एकमताने नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू, एमआईटी कराड चे संचालक आणि अनेक पुस्तकांचे लेखक डॉक्टर शहाबु‌द्दीन नुरमहंमद पठाण उर्फ शा. नु. पठाण यांची 'संमेलनाध्यक्ष' म्हणून निवड केली आहे. यास डॉ. शा. नु. पठाण यांनी संमती दिलेली आहे.

तसेच या संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द साहित्यीक, समिक्षक, अनेक पुस्तकांचे लेखक आणि महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतितील आणि प्रबोधन चळवळीतील प्रसिध्द व्यक्तित्व प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, नाशिक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यास त्यांनी संमती दिलेली आहे.

या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष प्रसिध्द साहित्यीक प्राचार्य डॉक्टर शरयु बबनराव तायवाडे, नागपूर हे आहेत. साहित्य संमेलनाचे मुख्य आमंत्रक प्रसिध्द साहित्यीक, अनेक संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले, प्रबोधनकार प्रा. जावेद पाशा कुरेशी, नागपूर हे आहेत.

या दोन दिवसीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात 'समतावादी संत साहित्यातील मुस्लिम संताचे योगदान', 'फुले-शाहू-आंबेडकर साहित्य प्रवाहाशी मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाची बांधीलकी', 'संविधान प्रदत्त आर्थिक लोकशाही आणि अल्पसंख्यांकावरील आर्थिक हल्ले एक चिंतन', 'मुस्लिम मराठी साहित्यातील वेदना आणि विद्रोह', 'मुस्लिमांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांची चिकित्सा आणि प्रसार माध्यमांची भुमिका', 'अल्पसंख्यांकावरील सांस्कृतिक हल्ले आणि संवैध गानिक लोकशाही पुढील आव्हाने' हे पर्रिसवाद असून एक 'राष्ट्रीय कवी संमेलन' आणि 'आम्ही सावित्री फतिमाच्या लेकी कवी संमेलन, कथाकथन, प्रकट मुलाखत,नीय मुस्लिम परिषद, छवी पब्लिकेशन्स, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, श्री गुरुदेव सेवा मंडळ, नागपूर.


एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम आयोजित आहे. संमेलनात समाजात विविध साहित्य कृतितून प्रबोधन, एकात्मता, चिंतनात्मक वैचारिक लेखन करणाऱ्या आणि शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार आयोजित केले आहे.

संपूर्ण साहित्य परिसराला 'महात्मा जोतीबा सावित्री-फातीमा साहित्य परिसर' नाव देण्यांत आले असून, मंचाला 'संवैधानिक विचार मंच' नाव देण्यांत आले आहे. यावेळी नागपूर येथिल दिवंगत वैचारिक लेखक प्रा. डॉ. अकरम पठाण, प्रा. डॉ. जुल्फी शेख आणि मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे प्रवर्तक प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृति प्रित्यर्थ पुरस्कार देण्यांत येणार आहे.

संमेलन संयोजन समितीचे मार्गदर्शन मंडळात प्रा. एड. रमेश पिसे, एड. कुतूब जफर, मा.अब्दुल रउफ शेख, प्रा.डॉ. असलम बारी, मा. शकील पटेल, प्रा.डॉ. एस. एस. पठाण, एड. अशोक यावले, मा. ज्ञानेश्वर रक्षक, डॉ. शाहीद जाफरी साहेब, डॉ. ममता मून, माणिकराव खोब्रागडे, डॉ. नेहा गोडघाटे, अहमद कादर, हाजी नासिर साहेब, सुरेश मुन, प्रा. राहुल मुन, जमिल अंसारी, इमरान फैज, हनिफ कुरेशी, ताहिरा शेख, रोशनी गणवीर, रजनी संबोधी, डॉ. माधूरी पोफळे मैडम, मा. चित्तरंजन चौरे, हिफजुर्रहमान खान, फिरोज अहमद, संजय गोडघाटे, खेमराज भोयर, प्रितीबाला बोरकर, सुषमा कळमकर, प्रभु फुलझेले, रजनी फुलझेले, कलाम खान, जिया कुरेशी, कनीज सफीया शेख आणि तसेच शिखर संस्था अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर चे अध्यक्ष प्रा.डॉ. अजीज नदाफ, उपायक्ष डॉ. ई. जा. तांबोळी, सचिव अयुब नल्लामंदू, सदस्य डॉ. शकील शेख, डॉ. युसूफ बेन्नूर आदी असून संमेलनाची तयारी यांच्या मार्गदर्शनात करण्यांत येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment