चंद्रपुर :- crime newsदिनांक २१/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होवुन चंद्रपुर शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे सुरेश महादेव कामरे, वय-६० वर्ष, धंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ हा चोरी केलेले सोन्याचे दागीने विकणे करीता कुठे तरी घेवुन जात आहे अशा खबरे वरून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे २,६१,०००/- रूयाचे सोन्याचे दागीने मिळुन आले.
12 burglaries exposed by a hardened criminal
नमुद आरोपीस सोन्याचे दागीन्याबात विचारणा केली असता, त्यांनी पोलीस स्टेशन, तळोधी परिसरातील मौजा आकापुर येथे रात्रौ दरम्यान घरफोडी करून चोरी केल्याचे सांगितले. नमुद आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केले असता आरोपी नामे नामे सुरेश महादेव कामरे, वय-६० वर्ष, धंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ यांनी आज पावेतो पोलीस स्टेशन भद्रावती-०१, वरोरा-०३, सावली-०१, मुल-०१, तधोळी -०५ तसेच नागभिड ०१ अश्या घरफोड्या केल्याची कबुली दिली. वरील सर्व घरफोड्या मधील चोरी केलेला मुद्देमाल एकुण १९,१०,००० रूपयाचे सोन्याचे व चांदीचे दागीने व नगदी रूपये पंचा समक्ष आरोपीकडुन जप्त करण्यात आले.
आरोपी नामे नामे सुरेश महादेव कामरे, वय ६० वर्ष, धंदा-मजुरी, रा. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ हा मागील २० वर्षापासुन चोरी, घरफोडी तसेच इतर गुन्हयात फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे करीत आहेत.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ / धनराज करकाडे, पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/सुरेंद्र महंतो, पोअ/प्रफुल गारघाटे, पोअ/प्रशांत नागोसे, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/शशांक बदामवार, पोअ/अमोल सावे, चापोहवा/दिनेश अराडे, चापोअ/मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment