ऊर्जानगर (चंद्रपूर):- पर्यावरण मानवी जीवनाशी संलग्न असल्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणातच मानवी जीवनाचे रक्षण आहे.पारंपारिक सण साजरे करतांना पर्यावरणाची काळजी घेतली जावी व निसर्गाच्या संसाधनांचा योग्य वापर करून त्याचा नाश न करता ज्या समाजात घातक कुप्रव्रृती वाढलेल्या आहेत त्यांचे प्रतिकात्मक दहन करुन पर्यावरण पुरक होळी साजरी करणे व पर्यावरण युक्त सण उत्सव सामूहिक साजरे करणे हा राष्ट्रीय एकोप्याचा संदेश आहे असेच सर्व राष्ट्रीय सण उत्सव एकत्रित येऊन साजरे केले पाहिजे असे प्रतिपादन मा.विजय राठोड मुख्य अभियंता यांनी केले ते ऊर्जानगर येथील खुले रंगमंच मैदानात आयोजित सार्वजनीक पर्यावरणपूरक होळी या कार्यक्रमात बोलत होते.
Public and environmentally friendly festivals are a message of national unity....Vijay Rathod Chief Engineer
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजय राठोड साहेब मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र , उपमुख्य अभियंता श्याम राठोड, डॉ.भुषण शिंदे ,नितीन रोकडे,मिलिंद रामटेके तसेच बाहुबली डोडल महाव्यवस्थापक ( विवले) ,दिलीप वंजारी कल्याण अधिकारी, प्रकाश राऊत ठाणेदार पोलीस स्टेशन दुर्गापूर,पी .एम.जाधव जिल्हाकार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस, मंजुषाताई येरगुडे सरपंच ग्रामपंचायत ऊर्जानगर , रामदास तुमसरे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ,दुरेंद्र गेडाम अध्यक्ष महा अंनिस ऊर्जानगर ,वंश निकोसे युवा सोशल फाउंडेशन, कीसन अळदडे ऊर्जानगर स्पोटिंग क्लब तसेच सर्वांना खळखळून हसविणारे चंद्रपूरचे कवि नरेश बोरीकर, गोपाळ शिरपुरकर,अरूण घोरपडे,विजय वाटेकर तसेच ऊर्जानगरचे कवी सुरेन्द्र इंगळे, धर्मेंद्र कन्नाके,केशव कुकडे ,वैशाली रामटेके यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
खुले रंगमंच मैदानात सायंकाळी ६:३० ला श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर मा. विजय राठोड साहेब मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले यात समाजातील कुप्रवृत्तीचे जाळण्यात आल्या त्यानंतर हास्य कवि संमेलन घेऊन सर्वांना मनोरंजनातुन प्रबोधन करण्यात आले तसेच होळीनिमित्त पर्यावरण या विषयावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लहान करू होळी ,दान करू पोळी
याप्रमाणे पुरणपोळी,गाठी,व नारळ हे होळीत न टाकता एकत्र जमा करून डेबु व्रृध्दाश्रम देवाळा व अनाथाश्रम वांढरी येथे वितरीत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जूनारे यांनी केले तर प्रास्तावीक दुरेंद्र गेडाम यांनी केले तर आभार देवराव कोंडेकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता नारायण चव्हाण,नरेंद्र रहाटे,मुरलीधर राठोड,मनीष पाटील,शंकर दरेकर,विजय राठोड,विजय भोयर,हर्षल मेश्राम, इत्यादींनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment