सादिक थैम :-वरोरा पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी आणि डीबी पथक सह होळी सणानिमित्त अवैध धंद्यांवर रेडकामी पेट्रोलिंग करीत असताना एक इसम तालुक्यातील टेमुर्डा गावातील मेन चौकात संशयरीत्या हातात बॅग घेऊन उभा होता.त्याची.दोन पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपी कडून १किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.आरोपीचे नाव प्रफुल किशोर रामटेके वय २९ वर्ष. कॉलरी वॉर्ड वरोरा, ता.वरोरा याला अटक करून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई १३ मार्च २०२५ ला करण्यात आली.
आरोपीने स्वताच्या आर्थिक. फायद्याकरिता मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर क्याना/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया यांची विक्री करण्याकरिता सदर आरोपी जवळ असलेल्या निळ्या /काळया रंगाच्या बॅगमध्ये १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगून असताना मिळून आल्याने आरोपी प्रफुल किशोर रामटेके यांचे विरुद्ध गुंगिकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणामकारक पदार्थ अधिनियम (एन डी पी एस,ॲक्ट)१९८५ मधील कलम ८ (क),२०(ब),ii (ब) एन डी पी एस.ॲक्ट कायदा अन्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक ,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, सहा.पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन वरोरा चे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे,सपोनी शरद भस्मे, पोउपनी दीपक ठाकरे,पो. अ.संदीप मुळे,पो. अ.विशाल राजूरकर,पोहवा मोहन निषाद,दिलीप सुर,अमोल नवघरे,मनोज ठाकरे,महेश गावतुरे यांनी केली.वरोरा पोलीस अधिकारी व डिबी पथकाने होळीचे दिवशी केलेल्या मोठ्या कारवाई मुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
-----------------------------------
वरोरा तालुक्यात सर्रासपणे अवैध धंद्यांना ऊत
तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात सट्टा - पट्टी व अवैध दारू विक्री गल्लीबोळात व पान टपरीवर सुरू असल्याचे चित्र आहे.या धंद्यामुळे सामाजिक व्यवस्था ही धोक्यात आली असून पोलीस विभागांनीअवैध धंद्यांना आळा घालावा.अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0 comments:
Post a Comment