राजुरा :-स्थानिक बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने 'हॅलो होली इको फ्रेंडली' अंतर्गत आज दिनांक 13 मार्च 2025 रोज गुरुवारला पर्यावरण पूरक दुर्गुणांची होळी करण्यात आली.
या होळीमध्ये स्त्रीभून हत्या, पशु हत्या, भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती, प्रदूषण निरक्षरता रासायनिक रंग वाईट चालीरीती यांची प्रतिक्रिया असलेली कचऱ्यांची होळी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगे कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक शाळेचे सहाय्यक शिक्षक बंडू बोढे यांनी करून दाखविले कार्यक्रमात वृक्षतोड न करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली त्याचप्रमाणे पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने हातभार लावून पर्यावरण प्रतिदक्ष राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दीपक सातपुते यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक शिक्षक दीपक मडावी व सोनल नक्षीने यांनी केले हा उपक्रम दीपक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु नेहा तळवेकर कु वैशाली बोबडे कु सविता गेडेकर या सर्वांचे सहकार्य लाभले
0 comments:
Post a Comment