(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील रेती घाटातून अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहेत. अशातच शुक्रवारी रात्री नायब तहसिलदार यांनी अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला आहे.
The tractor without a number plate transporting illegal sand from Petgaon was seized.
सविस्तर वृत्त असे की,सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथे शुक्रवारी रात्री 2.00 वाजता रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असुन महसूल विभागाचा भरारी पथकाने गस्ती दरम्यान तालुक्यातील पेटगाव येथील जवळच असलेल्या उमा नदी पात्रातून पेटगाव कडे निघालेला क्रमांक नसलेला ट्रॅक्टर चौकशी व निरीक्षनाकरिता ट्रॅक्टर थांबवला असता वाहनामध्ये 1 ब्रास रेती आढळून आली. पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवान्याबद्दल विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. सदर कारवाई हि तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी केली.
0 comments:
Post a Comment