राजुरा 21 मार्च :-Murder Newsतालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या सास्ती येथिल मृतक आतिश बापू मोतकू(३२ वर्ष )रा सास्ती यांच्यावर (दि. २१) रोज शुक्रवारला दुपारी साडेबारा वाजता चन्ने देशी दारू दुकानाच्या बाजूच्या गल्लीत रामनगर (सास्ती) येथिल दोन भावंडांनी लोखंडी रॉडने वार केल्याने आशिष याचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहे.
Youth murdered in Sasti.
मृतक आशिष याला काही दिवसापूर्वीच एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्यातून तो बाहेर निघाला होता. नेहमीप्रमाणे तो गावात असताना त्याच्या मार्गावर आरोपी रेकी करीत असल्याचे बोलल्या जात असून आशिष बाहेर निघाल्याचे आरोपींना माहित होताच चन्ने देशी दारू दुकानापासून त्याचा पाठलाग केला तो जीव वाचविण्यासाठी पळाला मात्र गल्लीत त्याला पळण्यासाठी जागा मिळाली नसल्याने दोन्ही आरोपीने हातात असलेल्या लोखंडी रॉडने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच राजुरा प्रभारी पोलिस निरीक्षक (आयपीएस) अनिकेत हीरडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. परिस्थिती चिघळेल म्हणून दंगा पथकाला पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता राजुरा येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी उपजिल्हा पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल कचोरे व इतर पोलिस बंदोबस्त उपस्थित होता.सदर घटनेबद्दल गावात तर्कवितर्क लावत असून सदर घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याची चर्चा आहे. सास्ती या गावाला पूर्णपणे वेकोलीने वेढले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालतात. यापूर्वी बरेचदा अवैध व्यवसायातून मारपिठीच्या घटना घडलेल्या असून राजुरा शहरात गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहे. सास्ती येथे घटना घडली त्याच्या दोनशे मीटर अंतरावर पोलिस चौकी आहे. मात्र राजुरा पोलिस ठाण्यात पोलिसाची संख्या कमी असल्याने सास्ती चौकीत कोणीच राहत नाही. घटना स्थळाला लागूनच देशी दारू दुकान व बिअर बार असून याठिकाणी नेहमी वर्दळ असतात. याठिकाणी पोलिस चौकी कायम सुरू ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहे.
0 comments:
Post a Comment