राजुरा 22 मार्च :-
दि.21 मार्च ला भर दुपारी सास्ती येथील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आतिश मोतकू नामक युवकाची लोखंडी रॉड ने निर्घृण हत्या करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतील सास्ती येथील चन्ने देशी दारूच्या दुकानाच्या गल्लीत दुपारी अंदाजे 12:40 वाजता दरम्यान खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस स्टेशन येथील पथक तात्काळ घटनास्थळावर पोहचले. घटनास्थळ गाठून पंचनामा केल्या गेला. लगेच मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रवाना केले.
Two accused in Sasti murder case arrested.
सदर घटनेतील मृतक आतिश बाबू मोतकू वय 32 वर्ष यास अज्ञात आरोपीने जुन्या पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉड ने वार करून खून केल्याचे समोर आले. आरोपीचे दिशेने चक्र फिरवून पोलिस स्टेशन मधील DB पथकाचे मार्फतीने आरोपींचा शोध घेतला असता तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये आरोपी श्रवण दुर्गराज दुंपला (29) रा. रामनगर वार्ड सास्ती व दोन विधी संघर्ष बालक (अल्पवयीन ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक तथा प्रभारी पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे व राजुरा पोलिस करीत आहे. वेकोली च्या कोळसा खाणी आणि तेथील डिझेल, पेट्रोल चोरी, भंगार व मोठमोठे यंत्राचे सुटे भाग, कोळसा तस्करी चोरी , मोठमोठे केबल, लोखंडी वस्तू चोरी यामुळे यापरिसरात कायमच दहशतीचे वातावरण असते. त्यामुळें सास्ती या गावात पुर्णवेळ पोलिस कर्मचारी असणे अत्यावश्यक असताना अपुरा कर्मचारी मनुष्यबळाचे कारण देत तेथे पोलिस चौकी तर आहे परंतू पुर्णवेळ पोलिस कर्मचारी नाही त्यामुळें गुन्हेगारांना पुरते बळ मिळतं आहे. आतातरी पोलिस प्रशासन सास्ती गावात पुर्णवेळ पोलिस कर्मचारी नेमतात काय याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment