सादिक थैम वरोरा : मराठी विज्ञान परिषद पुणे आणि आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वोदय विद्यालय सुमठाणा च्या दिव्यानी हरणे तिने प्रथम तर अलेक्षा सलामे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य मराठी विज्ञान परिषद मुंबई विभाग वरोरा आणि आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय थोर वैज्ञानिक डॉ. सी व्ही रमण यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दि.२८ फेब्रुवारी रोजी विज्ञान विषयावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्वोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल २० मार्च रोजी जाहीर करण्यात आला. यात वर्ग नववीच्या दिव्याने हरणे हिने प्रथम तर आलेक्षा सलामे तिने द्वितीय क्रमांक पटकावला. आज शुक्रवार दि.२१ मार्च रोजी विजेत्या दोन्ही स्पर्धकांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत समन्वयकाची भूमिका बजावणारे सर्वोदय विद्यालयाचे विज्ञान शिक्षक संदीप खिरटकर यांना देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुरेश गोखरे यांनी केले. सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सुनील गौरकर यांच्यासह इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment