Ads

सर्वधर्म समभाव भावना जोपासली पाहिजे.- प्रशांत पाटील

राजुरा 28 मार्च :-नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा जिल्हा चंद्रपूर तर्फे रमजान ईद निमीत्त महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथील विद्यार्थ्यांना शेवयी, साखर व खारीक चे वाटप करण्यात आले.
The feeling of equality among all religions should be cultivated.- Prashant Patil
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत पाटील, प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणुन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे मिलींद गड्डमवार, तालुका संघटक , किरण कोल्हापुरे, महीला तालुका अध्यक्षा, विलास कुंदोजवार, नागपूर विभाग अध्यक्ष, स्मिता धोटे, पर्यवेक्षक, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांनी केले. प्रास्तावीक बादल बेले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक राष्ट्रवंदना घेण्यात आली.

कार्यक्रमाला सूनैना तांबेकर, माधुरी गड्डमवार, अंजली गुंडावार, अल्का गंगशेट्टीवार, संगिता पाचघरे, मेघा धोटे, माधुरी डफाडे, उषा टोंगे, कोरपना तालुका महिला अध्यक्ष, अरुणा सालवटकर, कोरपना तालुका महीला सचिव, श्रीरंग ढोबळे, संतोष देरकर, बबलू चव्हाण, रवी बुटले, भास्कर करमनकर, प्रथमेश तांबेकर आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नवीन सदस्य संघटक व नुतनीकरण केलेल्या सदस्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून प्रशांत पाटील यांनी सर्वधर्म समभाव जपत सण समारंभ आनंदाने साजरे केले पाहिजेत. सोबतच सामाजिक जाणिव जोपासत समाजातील लोकांना सहकार्य, मतद केली पाहिजेत. नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कार्यात पर्यावरण सोबतच मानवता विकासाचे,जनजागृती, मदतीचे अनेक उपक्रम राबविले जातात याबद्दल समाधान व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे होऊन सामाजिक भान जोपासावे , आपले समाजाप्रती काही देणं लागत ही भावना सुद्धा जोपासली पाहिजे असे प्रतिपादन पाटिल यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment