Ads

दूर्गापूर हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरुध्द एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये स्थानबध्द आदेश

चंद्रपुर :-पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार ज्यात चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणारे, विनापरवाना हत्यार बाळगणारे, दुखापत करणारे, बलात्कार करणारे, अवैध धंदे करणारे विरुध्द MPDA Act अन्वये प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवुन त्याचा नियमित पाठपुरावा करुन अशा प्रकारच्या गुन्हे करणारे धोकादायक इसमास स्थानबध्द करण्याची मोहीमे अंतर्गत
M.P.D.A. Act against criminal in Durgapur area. Placement order under M.P.D.A. Act
पो.स्टे. दुर्गापूर हदीतील अशाच प्रकारचे गुन्हे करणारा आणि सर्व सामान्य जनते मध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण करुन जनजिवन विस्कळीत करणारा सराईत गुन्हेगार व धोकादायक इसम करीम फिरोज सय्यद वय २७ वर्ष रा. सुमित्रानगर तुकूम चंद्रपूर याचे विरुध्द श्री सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे नेतृत्त्वात पोनि श्रीमती लता वाडीवे यांनी MPDA Act अन्वये स्थानबध्द प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी दस्ताऐवजाची पडताळणी करुन सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले असता आज रोजी नमुद इसम नामे करीम फिरोज सय्यद यास MPDA Act चे तरतूदीनपुर मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्थानबध्द आदेश मंजुर केल्याने सदर इसमा त्वरीत प्रभावाने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री अमोल काचोरे, स्थागुशा चंद्रपूर, पोनि श्रीमती लता वाडीवे, पोनि श्री प्रकाश राऊत व पो. ठाणे दुर्गापूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment