राजुरा 2 मार्च :-विदर्भ पटवारी संघ, नागपूर उपशाखा राजूरा ची वार्षिक आमसभा नुकतीच पटवारी भवन राजुरा येथे अध्यक्ष किशोर कुलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Newly appointed executive committee of Vidarbha Patwari Sangh Sub-Division Branch Rajura announced.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे सचिव संपत कन्नाके, राजूरा उपविभाग शाखेचे उपाध्यक्ष सुनिल रामटेके, सचिव लक्ष्मीकांत मासिरकर, माजी मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, रविंद्र खोब्रागडे, दिनेश पत्तीवार, सुमंत गेडाम होते. यावेळी राजूरा उप विभागाच्या नवनियुक्त कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी किशोर कुलकर, उपाध्यक्ष म्हणून दामोदर शेंडे , सचिव सागर कोडापे, सहसचिव स्नेहल दाबेराव ,कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत मासिरकर, सदस्य म्हणून प्रविण गंधमवार, श्रीकृष्णा कुळसंगे , प्रविण रामटेके, अजय गेडाम, परवेझ शेख , विनायक शेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कोडापे यांनी केले तर आभार अनिल पेंदोर यांनी मानले.
0 comments:
Post a Comment