Ads

सभापतीवरील अविश्वास ठराव बारगळला

सादिक थैम :-वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्यावर विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव विरोधक सभेला उपस्थित न राहिल्याने बारगळला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या कार्यप्रणालीवर असमाधान व्यक्त करत 12 संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता.
No-confidence motion against Speaker passed
 या अविश्वास ठरावावर आज ५ मार्च रोजी विशेष आमसभा घेण्यात आली होती.अविश्वास आणणाऱ्या बारा संचालकांपैकी एकास जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्यामुळे विरोधकाकडे केवळ 11च संचालक राहिले. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी 12 संचालकांची आवश्यकता होती. विरोधकांजवळ पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे ते आज अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आयोजित सभेला उपस्थित राहिलेच नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे यांचेवरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आज 5 मार्च रोज बुधवारला कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात तहसीलदार योगेश कोटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला सत्तारूढ पक्षाचे सर्व सभासद उपस्थित होते. मात्र अविश्वास आणणारे केवळ तीन ते चारच संचालक सभागृहात आले व त्यांनी पिठासीन अधिकाऱ्याला एक निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर ते उपस्थिती रजिस्टर वर स्वाक्षऱ्या न करताच निघून गेले. अविश्वास ठराव आणणाऱ्या पैकी एकही उपस्थित न राहिल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव बारगळल्याचे जाहीर केले.
    वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे अविश्वास ठराव आणणाऱ्या संचालकात मापारी गटातून विजयी झालेले पांडुरंग सोनबाजी झाडे यांचा समावेश होता मापार्‍यांना 58 वर्षाची वयोमर्यादा असल्यामुळे त्यांचा परवाना रद्द झाला.
           कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 27 मार्च 2024 च्या सभेत पांडुरंग झाडे हे संचालक राहू शकत नाही असा ठराव पारित झाला. हा ठराव समितीने जिल्हा  उपनिबंधक कडे पाठविला. जिल्हा उपनिबंधकांनी  या ठरावाला मान्यता दिली. त्यामुळे पांडुरंग झाडे यांचे संचालक पद आपोआप खारीज झाले. 
       पांडुरंग झाडे यांनी या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर  खंडापिटात आव्हान दिले. न्यायालयाने या निर्णयाला  तात्पुरता स्थगनादेश दिला होता. या आदेशांवरील स्थगनादेश उठवत  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९ जानेवारी 25 ला निकाल देत जिल्हा उपनिबंधकाचा आदेश कायम ठेवला.
     यानंतर पांडुरंग झाडे यांनी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे परवाना नूतनीकरणासाठी अर्ज सादर केला परंतु मापार्‍याकडे एक वर्षापासून कोणताच परवाना नसल्याने परवान्याचे नूतनीकरण करता येत नाही असा नियम असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे पुन्हा अर्ज सादर केला. यावर परवानाच्या नूतनीकरणाबाबत न्यायालयाच्या आदेशापासून चार आठवड्यापर्यंत निर्णय घेण्यात यावा असा निर्णय न्यायालयाने दिला.
 न्यायालयाच्या या निर्णयानंतर पांडुरंग झाडे यांनी समितीच्या कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पुन्हा अर्ज केला. मात्र त्यांचा अर्ज फेटाळून त्यांचा त्यांना परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे ते संचालक राहू शकत नव्हते.
      कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांचे वर बारा संचालकांनी  अविश्वास प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व  संचालकांना तशा नोटीस पाठवले. 
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी या 12 संचालकांपैकी पांडुरंग झाडे हे संचालक नसल्यामुळे त्यांची नोटीस रद्द करण्यात यावी अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकाकडून अहवाल मागितला. त्यावर सदर संचालक अपात्र असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 4 मार्च रोज मंगळवारला पांडुरंग झाडे हे अपात्र असल्याने त्यांचे संचालक पद रद्द केले. त्यामुळे त्यांची नोटीसही रद्द झाली. 
    त्यामुळे अविश्वास ठराव आणणाऱ्या संचालकांची संख्या 12 वरून 11 झाल्याने विरोधकांनी आज सभेला उपस्थित न राहता मतदाना पासून स्वतःला दूर ठेवले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांचे वरील अविश्वास ठराव बारगळला.
          ‌ अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वी पांडुरंग झाडे यांना अपात्र ठरविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा असल्याने ही बैठक आठ दिवसानंतर पुन्हा बोलवण्यात यावी अशी मागणी करणारे एक निवेदन पिठासीन अधिकारी तहसीलदार योगेश कौटकर यांना काही विरोधकांनी दिले. मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी सदर मागणी करणारा अर्ज फेटाळला. त्यामुळे विरोधकांची संख्या 12 वरून अकरावर आली व सभापतीवरअविश्वास प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस चक्काचूर झाला.
    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव आणण्यात खासदारांचा प्रयत्न असल्याचा आरोप होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या आमदार करण देवतळे यांचे काका डॉ. विजय देवतळे व त्यांचे  सहकारी सत्तारूढ असल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना सत्तेवरून खेचण्याचा खासदारा चा प्रयत्न यामुळे फसला. यापूर्वी शहराजवळील बोर्डा ग्रामपंचायत वर देखील अशाच प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला होता. चुकीच्या पद्धतीने दोन स्वायत्त संस्थांवर अविश्वास ठराव आणण्याचा खासदार महोदयांचा प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा मात्र या निमित्ताने ऐकावयास मिळत नाही.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment