जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील पिरली येथील शेत शिवारात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून तीन जुगारांना ताब्यात घेतले आहे. तर सहा जुगारी घटनास्थळावरून फरारी झाली आहे. त्यांच्याकडून दोन लक्ष पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जुगाऱ्यांना सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे.
सदर कारवाई दिनांक 18 रोज मंगळवार रात्रो साडेसात वाजता भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली. सदर शेत शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून मोटरसायकल, पत्ते तथा रोख रक्कम असा दोन लक्ष 5,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनात महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुधरी,जगदीश झाडे, निकेश ढेंगे व खुशाल कावडे यांनी केली.
0 comments:
Post a Comment