राजुरा 28 मार्च:-Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोनुर्ली (सो.) ता. राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील विवेक सुधाकर गुरनुले यांनी बाजी मारली आहे. नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये विवेकची पोलिस उपनिरीक्षक ( PSI) म्हणून निवड झाली आहे.
Sonurli Vivek will become a police sub-inspector.
विवेक हा अतिशय सामान्य घरचा मुलगा असून लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च.प्राथ . शाळा, सोनुर्ली येथे झाले. पदवीनंतर पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. सध्या तो नायगाव जिल्हा नांदेड येथे कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. मागिल महिन्यात त्याची आरोग्य सेवक, कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली होती. पण त्याचे लक्ष होते पोलिस उपनिरीक्षक. आणि ते विवेकने मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून साध्य केले आहे. आपली परस्थिती कशीही असो पण कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते हे विवेकने एकाच वर्षात चार शासकीय सेवेतील पद मिळवून सिद्ध केलं आहे. ग्रामीण भागातील तरुणासाठी विवेक एक आदर्श ठरला आहे. विवेकने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक, पाठीशी खंबीरपणे उभा असलेला मोठा भाऊ निलेश गुरनुले आणि काका नरेश गुरनुले यांना दिले आहे. विवेकच्या यशाबद्दल सोनुर्ली परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment