Ads

धरणे आंदोलन सुरू असताना तानाशाही करत दुसऱ्या कंपनीच्या कामाला सुरुवात

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- प्रति एकरी दहा लाख रुपये अनुदान, प्रकल्पग्रस्त, कंपनी व एमआयडीसी मध्ये त्रिपक्षीय करार करणे व प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी देणे या प्रमुख मागण्यांसाठी एक आठवड्यांपूर्वी मोर्चा काढून व निवेदन देऊनही शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याची दखल न घेतल्याने अखेर निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे दिनांक 24 रोज सोमवरला सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
Another company started work while the sit-in protest was going on, acting dictatorially.
सदर धरणे आंदोलन हे पाच एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.
मात्र एकी कडे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचे सांगणारे जिल्हाधिकारी आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाची दखल न घेता न्यू इरा क्लीनटेक solution कंपनीचे काम करण्याची परवानगी कशी काय देतात?
भारी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन १६०० एकर मध्ये काम सुरू करण्यात आले.कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या व्यथा न संपवता त्यावर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार व प्रशासन करत असल्याची खंत इंजी अनुप कुटेमाटे यांनी व्यक्त केली.
सदर आंदोलनाची दखल न घेता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत पर्यंत काम बंद न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
अध्यक्ष प्रविण सातपुते, सचिव सुधीर सातपुते, बंडू भादेकर संघटक मधुकर सावनकर, चेतन गुंडावार, अनुप कुटेमाटे, संदीप कुटेमाटे, बबन डोये जगन दानव, देवराव खापणे, सुरेश बदखल तेजकरन बदखल , रवी बोडेकर बापू सोयाम व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment