Ads

सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायती चे अतिक्रमणे हटविण्या संदर्भात मौन का ?

(प्रशांत गेडाम)सिदेवाही : सिंदेवाही- लोणवाही शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पण याकडे सतत मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगरपंचायत समोरील बाजारपेठेतील रस्त्यावर लागतात दुकानाचे सामान व फलक , हातगाड्या, बेकायदेशीर पार्किंग, आणि बेशिस्त वाहनामुळे नागरिकांना होणारा त्रास या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
Silence regarding removal of encroachments by Sindewahi-Lonwahi Nagar Panchayat?
शहरातील सिमेंट रस्ते अरुंद होत आहेत, पण नगरपंचायत यावर काहीच कारवाई करत नसल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे.
शिवाजी चौकात झपाट्याने होत असलेले दुकानाचे बांधकाम कसल्याही प्रकारची नगरपंचायतची परवानगी न घेता होत आहे.
बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे, साधी चारचाकी साठी रस्त्यावरील दुकानदाराशी अनेकदा भांडण होतात. बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था नाही, नगरपंचायत समोर बिनधास्तपणे गाड्या ठेवल्या जातात. नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन या सर्व कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मध्यंतरीच्या काळात नगरपंचायतीने अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात विशेष पाऊले उचलली होती. मात्र आता ती कारवाई थंडावली आहे.तसेच याकडे मुख्याधिकारी लक्ष देत नाही अशी शहरातील सुजान नागरिकांची ओरड आहे.
सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायतीला कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाही
'त्यामुळेच' काही कामे खोळंबली आहेत. तसेच काही विकास कामे ठप्प झाले आहेत यामुळे काही आम्ही ठोस निर्णय घेऊ शकत नाही. व सिंदेवाही- लोनवाही शहरातील तसेच बाजारपेठेतील अतिक्रमण धारकांना नोटीस पाठविले असुन लवकरच अतिक्रम काढण्यात येईल....
श्री.भास्कर नन्नावार नगराध्यक्ष
सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायत
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment