चंद्रपुर :- ठेकेदाराचे काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपुर हर्ष यशोराम बोहरे, वरिष्ठ सहाय्यक सुशील मारोती गुंडावार, परिचर मतीन शेख यांना ४ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.ACB trap
Executive Engineer, Rural Water Supply Department, Senior Assistant and Assistant arrested by Anti-Corruption Department while accepting a bribe of Rs. 4.20 lakh
तक्रारदार हे जिवती, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या "जल जीवन मिशन" कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता बोहरे यांनी स्वतः करीता ४,००,०००/-रूपयेची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता २०,०००/- रूपयेची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन ४,२०,०००/-रूपये लााचेची मागणी केली. तक्रारदार यांची बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक. सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ४,२०,०००/-रु. लाच देण्याची ईच्छा नसल्याने बोहरे व सुशील गुंडावार, यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०७/०४/२०२५, ०९/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे. हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४,२०,०००/-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दिनांक १०/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र. २ सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम ४,२०,०००/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २०,०००/- रूपये स्वतः करीता वेगळे काढुन उर्वरीत ४,००,०००/- रूपये आलोसे क्र. ३) मतीन शेख यांना आलोसे क्र. १) हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने आलोसे क्र. ३) मो. मतीन शेख यांनी आलोसे क्र.२) श्री. सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून आलोसे क्र. १) श्री. हर्ष बोहरे यांचे घरी नेउन दिली. सदरची लाचरक्कम स्वीकानारे आलोसे क्र. १ व २ यांना ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे क्र. १ यांना लाचरक्कम नेउन देणारे आलोसे क्र. ३ यांना ताब्यात घेण्यात आले असुन आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी पो.स्टे. रामनगर, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. नि. जितेंद्र गुरनूले, पो. हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो.अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
0 comments:
Post a Comment