Ads

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी चंद्रपूरच्या चार गुणवंतांची निवड

चंद्रपूर:-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,संघटात्मक,क्रीडा व साहित्यिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याऱ्या कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व कामगार भूषण पुरस्काराकरिता निवड करण्यात येते.यावर्षी नुकतीच
सन २०२३ या वर्षातील ५१ विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व १ कामगार भूषण पुरस्काराकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील श्री.किसनभाऊ नागरकर महापारेषण कंपनी बल्लारपूर , श्री.बंडूभाऊ पिंपळशेंडे चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र व आयु वंदना मनपे मॅडम चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र महानिर्मिती कंपनी व सौ देवकी कोकास मॅडम बल्लारपूर पेपर मिल यांना जाहीर झाला.
Four meritorious people from Chandrapur selected for Vishwakarma Meritorious Worker Award
या पुरस्काराचा वितरण समारंभ मंगळवार दिनांक. १३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रमादेवी रेल्वे स्थानकाजवळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर पुरस्कार सोहळा मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री तसेच स्थानिक मा. लोकसभा/राज्यसभा सदस्य, मा.विधानसभा,मा. विधानपरिषद सदस्य तथा विविध मा. अशासकीय सदस्य व शासनाचे विविध विभागाचे मा. प्रधान सचिव, मा. सहसचिव, मा. उपसचिव आधी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त मा.रविराज ईळवे,मा.नंदलाल राठोड कल्याण उपायुक्त, गटकार्यालय चंद्रपूरचे कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र रहाटे,जिल्हाध्यक्ष देवराव कोंडेकर यांनी केले व पुरस्कार्थ्याचे अभिनंदन सुद्धा केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment