जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :- Bhadravati Revenue Departmentभद्रावती महसूल विभागातर्फे अवैध रेती तस्करीच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून एकता नगर व चारगाव येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई करीत त्यांना तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.illegal sand smuggling
अवैध रेती तस्करी विरोधातील या सततच्या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे चांगले दणाणलेले आहे. सदर कारवाई भद्रावती महसूल विभागातर्फे दिनांक 24 रोज गुरुवारला रात्रो अकरा वाजताच्या दरम्यान एकता नगर व चारगाव येथे करण्यात आली. भरारी पथकाची गस्त सुरू असताना एकता नगर येथे एमएच 39 आर 93 44 या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर चारगाव येथे एम एच 34 एपी 0450 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या दोन्ही ट्रॅक्टर चालकांकडे रैतीचा परवाना नसल्याने सदर दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करून त्यांना तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख मनोज अकनुरवार, मंडळ अधिकारी समीर वाटेकर तलाठी खुशाल मस्केयांनी केली.
0 comments:
Post a Comment