Ads

कावेरी कंपणी विरुद्ध कामगार आयुक्तकडे तक्रार केली म्हणून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल

चंद्रपूर -false extortion case युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याविरोधात माती उत्खनन करणाऱ्या कावेरी कंपनीने 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. उबाठा शिवसेना प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख सहारे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माझ्यावर कावेरी कंपनीने खोटे गुन्हे दाखल केले आहे असा आरोप लावला.
A false extortion case was registered against me for filing a complaint with the Labour Commissioner against the Cauvery Company - Vikrant Sahare
चंद्रपुर जिल्हा कोळसा खाणीने वेढला असून यामुळे इतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे, भटाळी कोल माईन्स मधून माती चे उत्खनन करण्याचे काम आंध्रप्रदेश मधील कावेरी सी 5 जेवी या कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे स्थानिकांना कंपनीत रोजगार मिळेल अशी आशा अनेकांना लागली मात्र त्या कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांकडून पैसे घेत कामावर घेण्यात आले, डिसेंम्बर महिन्यात अल्पवयीन मुलगा कामावर लागला मात्र कावेरी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजर वेंकटेश्वर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला बोलावीत तू कामाला लागण्यासाठी पैसे का दिले म्हणून त्याला मारहाण करीत कामावरून काढले व ही बाब कुणाला सांगू नको असे खडसावले, सदर घटना जानेवारी 2025 मधली आहे.

सदर अल्पवयीन मुलाला कामाचा मोबदला मिळाला नाही उलट त्याला मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या आईने न्यायासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडे मदत मागितली.
20 मार्च रोजी विक्रांत सहारे यांनी अल्पवयीन मुलगा व त्याची आई यांना सोबत घेत कावेरी कंपनीत कामाचा मोबदला व मारहाण का केली याबाबत जाब विचारला मात्र मॅनेजर रेड्डी यांनी अरेरावी ची भाषा करीत तुम्हाला जे करायचं ते करा असे उत्तर दिले. 22 मार्चला सहारे यांनी कावेरी कंपणीविरुद्ध कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागितली, सदर कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांकडून अवजड कामे करून त्यांना मोबदला न देता मारहाण करण्यात येते अशी तक्रार केली. याबाबत कारवाई संदर्भात कामगार आयुक्ताने संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार सुरू केला.

विक्रांत सहारे यांनी कंपनी बाबत तक्रार का केली म्हणून 31 मार्च रोजी विक्रांत सहारे यांनी 5 लाखांची खंडणी मागितली असा गुन्हा रेड्डी यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला.

यावर 19 एप्रिलला विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषद घेत कावेरी कंपनी व पोलीस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला, ते म्हणाले रेड्डी यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या कार्यालयातील 2 कर्मचारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात आले आणि मला कामगार आयुक्तांना तक्रार का केली असे विचारले, त्यावर माझा इगो हर्ट झाला, आता मला 5 लाख रुपये व माझे काही लोक कामावर घ्या असा उल्लेख आहे.
मात्र या प्रकरणात ते दोन कर्मचारी फिर्यादी व्हायला हवे होते तसे झाले नाही, जे माझ्या कार्यालयात कधी आले नाही ते या प्रकरणात फिर्यादी बनले, विशेष बाब म्हणजे त्यांच्या तक्रारीत उल्लेख असलेले दोन्ही कर्मचारी माझ्या कार्यालयात आलेच नाही, 2 एप्रिलला त्यामधील एका कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये हमीपत्र दाखल केले की आम्ही विक्रांत सहारे यांच्या कार्यालयात कधी गेलेलो नाही, आमचं नाव त्या पोलीस तक्रारीत टाकण्यात का आले हे सुद्धा आम्हाला समजले नाही.
गुन्हा खोट्या स्वरूपाचा असून याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर अल्पवयीन कामगार मारहाण प्रकरण आता दिल्ली राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे वर्ग करण्यात आले आहे. लवकरच पुढील कारवाई होणार अशी माहिती आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल, कांग्रेसचे प्रशांत भारती, आपचे राजू कुडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे संजय ठाकूर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment