Ads

जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; ११ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

चंद्रपुर :-दि. 11/4/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस अधीक्षक सा.चंद्रपुर यांचे आदेशाने पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना बल्लारशाह पेपरमीलच्या मागे, वर्धा नदीच्या काठी निखील रणदिवे रा. बल्लारशाह हा इसम काही इसमांना सोबत घेऊन 52 ताश पत्याचा कट पत्याचा जुगार खेळत असल्याची गोपनिय बातमीदारकडुन मिळालेल्या माहीती वरून,
Local Crime Branch raids gambling den
सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सापळा रचुन छापा मारला असता, घटनास्थळावर चंद्रपूर, राजुरा, बल्लारशा येथील राहणारे एकुण अकरा आरोपीत जुगाऱ्यांना जुगार 52 ताश कट पत्ता गेम खेळत असतांना मिळुन आले. जुगाराचे डावावर व त्यांचे अंगझडतीत एकुण 1,78,300 / रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला. अकरा आरोपीतांस ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध पोस्टे बल्लारशाह येथे अप क 267/2025 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोस्टे बल्लारशाह करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलीस उपनिरीक्षक, विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि गौरकार, सफौ. करकाडे, पो. हवा. सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, नितीन कुरेकार, पो.कॉ. प्रशांत नागोसे, शशांक बादमवार, प्रफुल गारघाटेयांनी केली आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment