भद्रावती जावेद शेख :-
आज दिनांक.२ एप्रिल सायंकाळी पाच वाजता स्थानिक आमदार करन देवतळे यांनी तहसील कार्यालय जवळ धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत चर्चा केली व आपल्या मागण्यांसंदर्भात लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करू व आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे सूचित केले तसेच आंदोलकावरील विविध गुन्हे मागे घेण्यात येईल याबाबत गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष चर्चा करु. तसेच न्यू. एरा कंपनीच्या खोदकामाची चौकशी करून तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येईल असे आमदार करन देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांना आवर्जून सांगितले.
MLA Karan Deotale visits the protest site of Nippon project-affected people for the first time...
याप्रसंगी तहसीलदार साहेबांनी सुद्धा १०दिवसांनंतर प्रथमच धरणे आंदोलन स्थळी भेट दिली
यावेळी अनेक महिला, पुरुष प्रकल्पग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे सदस्य अनुप कुठे माटे, लिमेश माणूस मारे , प्रवीण सातपुते, सुरज गुंडा वार, मधुकर सावनकर,पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment