(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- शहरात पाण्याच्या भीषण टंचाईने पुन्हा एकदा नागरिकांचे जीवनमान ढवळून निघाले आहे. उमा नदी व परिसरातील नैसर्गिक जलस्रोत असूनही योग्य नियोजनाअभावी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावा लागत आहे.
त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून शहरात पाण्यासाठी हाहाकार माजलेला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तसेच- नगरपंचायतने गाजावाजा केलेल्या वॉटर एटीएमचा उडाला फज्जा
नगरपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरात वॉटर एटीएम बसवले होते. मात्र देखभाल व नियमित दुरुस्तीच्या अभावामुळे ही यंत्रणा पूर्णतः बंद पडली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बसवलेली ही सुविधा आज शोपीस ठरली आहे.
मुख्याधिकारी नसल्याने प्रशासन ठप्प : या संपूर्ण गंभीर समस्येमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे नगरपंचायतीकडे स्थायी मुख्याधिकारी नाही. प्रभारी अधिकारी नेमके कधी येतात याची माहिती कुणालाही नसते. त्यामुळे समस्यांवर उपाययोजना कोणी करायच्या, हा प्रश्न अधिक गहन बनतो.
0 comments:
Post a Comment