Ads

भंगार चोरी करणा-या टोळी कडुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर नी चोरी गेलेला ५,७९,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

चंद्रपुर :-भंगार चोरी करणा-या टोळी कडुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर नी चोरी गेलेला माल व गुन्हयात वापलेल्या वाहनासह ५,७९,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला
Local Crime Branch, Chandrapur seizes stolen goods worth Rs. 5,79,000/- from scrap metal theft gang
दिनांक २३/०४/२०२५ रोजी फिर्यादी नामे रविंद्र विश्वनाथ चहारे, रा. पठाणपुरा वार्ड, चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, सिव्हील लाईन, पटवारी ऑफिस, चंद्रपुर येथे सिमेंट रोड बांधकाम करण्याचे काम सुरू असुन सदर ठिकाणी रोड बांधकामा करीता ३१ नग लोखंडी चॅनल (सेंट्रीग प्लेटा) ठेवलेल्या असतांना दिनांक २१/०४/२०२५ रोजीचे रात्रौ दरम्यान कोणी तरी अज्ञात चोराने चोरून नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.scrap metal theft gang

दिनांक २७/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला माल व अज्ञात आरोपीचा शोधत निघाले असता चंद्रपुर शहरात रवाना होवुन मुखबिरचे खबरे वरून तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीतांना गोल बाजार, तिलक मैदान, चंद्रपुर येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेले ३१ नग लोखंडी चॅनल, गुन्हयात वापरलेले ई रिक्षा तसेच मोपेड गाडी असा एकुण ५,७९,०००/- रू. चा माल जप्त केला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींचे नाव पुढीलप्रमाणे आहे :- १) हर्षद कालीदास मेश्राम, वय-२४ वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपुर, २) धनराज सुधार लोणारे, वय-३० वर्ष, रा. गोपाल पुरी वार्ड, चंद्रपुर, ३) आशिष भगवाना आल्लेवार, वय-२४ वर्ष, रा. भिवापुर वार्ड, चंद्रपुर, ४) अमन अजीच शेख, वय ३८ वर्ष, रा. भिवापुर वार्ड, चंद्रपुर

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा/दिपक डोंगरे, पोअ/प्रशांत नागोसे, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment