राजुरा २ मे:- राजुरा येथील डब्ल्यूसीएल सास्ती ओपन कास्ट परिसरात असलेल्या 66 केव्ही सबस्टेशनमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत ५ ते ६ अज्ञात आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून चोरी केली. या घटनेत आरोपींनी बुशिंग व बारपट्टी असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.ही घटना 30 एप्रिल च्या पहाटे च्या सुमारास घडली.Robbery
या घटनेची तक्रार वीरेंद्र कुमार शर्मा (वय ३८), असिस्टंट मॅनेजर, वेकोली, सास्ती यांनी राजुरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे. त्यांनी सांगितले की, चोरीवेळी आरोपींनी धारदार शस्त्र दाखवून धमकी दिली सर्वाना बसवून ठेऊन मुद्देमाल घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्याने तिथे असलेले सीसीटीव्ही चे वायरही तोडले व सर्व आरोपी तोंडावर रुमाल बांधून होते.
या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३१०(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. चोरीप्रकरणी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती.
या गंभीर गुन्ह्याचा तपास चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम चंद्रपूर आणि राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिकेत हिरडे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार हे करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करीत तलवार जप्त केली असुन आरोपी सह मुद्देमाल जप्त केला आहे.
वेकोलीच्या येथील कोळसा खाणीत दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत असून या चोरट्यांनी वेकोली प्रबंधणाच्या नाकी नऊ आणले आहे. सुरक्षा यंत्रणा तर आहेच शिवाय खाणीच्या सुरक्षेसाठी गावातच राजुरा पोलीस स्टेशन ची एकमेव पोलीस चौकी असूनही या भागातील चोऱ्या थांबता थांबेना यासाठी वेकोली सह पोलीस प्रशासनाने चोरट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment