(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त सिंदेवाही येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ध्वजारोहण तहसीलदार संदीप पानंमद याच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास नायब तहसीलदार मंगेश तुमराम, रणजित देशमुख, सागर वाहने, सिंदेवाही पोलीस निरीक्षक , होमगार्ड पथकाचे समादेशक अधिकारी सुरज रामटेके, सिंदेवाही नगरपंचायतचेे नगराध्यक्ष भास्कर ननावरे ,नगरसेवक व्यापारी यशोशिएशनचे अध्यक्ष, तथा विविध पक्षाचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार बांधव महसूल कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ' महाराष्ट्र देशा' या गीताने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून गेले. या कार्यक्रमातून उपस्थितांना महाराष्ट्राच्या सामूहिक सामर्थ्याची आणि सामाजिक एकतेची प्रचीती आली.
राज्य दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला, समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि मेहनती जनतेच्या कणखरपणाला अभिवादन करण्याचा पवित्र क्षण होता. या राज्याने आपल्याला ओळख, संधी आणि अभिमान दिला असून, त्याच्या उज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा अशा प्रसंगी मिळते, असे तहसीलदार संदीप पानंमद यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment