राजुरा, १ मे — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब राजुराच्या वतीने शहरातील कचरा संकलन करणाऱ्या सुमारे ५० ठेकेदारी कामगारांचा सन्मान करण्यात आला. या सर्व कामगारांना रोटरी क्लबचा सिम्बॉल असलेली टोपी आणि दुपट्टा भेट देण्यात आला.
सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान लक्षात घेता, दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या या कामगारांना उन्हापासून संरक्षण मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. रोटरी क्लबने त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
हा कार्यक्रम नगरपरिषद राजुरा कार्यालयात पार पडला. यावेळी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे, सचिव निखिल चांडक, उपाध्यक्ष अमजद खान, माजी अध्यक्ष कमल बजाज, तसेच सदस्य किरण ढुमणे, राजू गोखरे, आनंद चांडक, डॉ. अमोघ कल्लुरवार, अहमद शेख, विनोद चेन्ने आणि केतन जुनघरे प्रमुख उपस्थित होते.
रोटरी क्लब राजुरा सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असून, पुढील काळातही असे उपक्रम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
0 comments:
Post a Comment