जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
शेतात मशागत सुरु असतांना विज पडून एका बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असुन दुसरा बैल जखमी झाला. सदर घटना केसुर्ली शेतशिवारात दिनांक २७ रो मंगळवारला दुपारी घडली.
Bull dies after being struck by lightning while ploughing
बैलाच्या मृत्युमुळे या हंगामात शेती कशी करायची हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे पडला असुन नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. कोंढा येथील प्रवीण नामदेव आगलावे यांची केसुर्ली शेतशिवारात शेती आहे.घटनेच्या दिवशी शेतात मशागतीचे काम सुरु असतांना अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात अंगावर विज पडून एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसरा बैल जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.सदर बैलाची किंमत एक लाख रुपये सांगण्यात आली.
0 comments:
Post a Comment