जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन करून सर्व उपस्थित पाहुणे मंडळींना ग्रामगीता व संविधानाचे दान देऊन समाजासमोर एक आदर्श गौरकार व खापणे परिवाराने ठेवला.
A unique message from the Gorkar and Khapane families by donating the Gram Geeta and the Constitution from an ideal wedding ceremony
धनोजे कुणबी सभागृह वरोरा येथे दोन हृदये एका धाग्याने बांधली हे बंधन फक्त दोन व्यक्तीचे नाही, तर दोन कुटुंबांचे, दोन संस्कृतीचे होते. सामाजिक एकतेचे वैदिक विधींच्या साक्षीने, हे बंधन काळाच्या कसोटीवर उतरेल असा संकल्प करण्यात आला.चि.सौ .का.तृष्णा मारोती गौरकार आणि ग्रामगीताचार्य ॲड. चि.अतुल संभाजी खापणे यांचा विवाह सोहळा गुरूदेव सेवा मंडळाच्या वैदिक पद्धतीने धार्मिक वातावरणात, सर्वप्रथम वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यानंतर संकल्प गीत तसेच समधुर संगीत साई प्रकाश म्युझिकल ग्रुप प्रकाश पिंपळकर व संच यांच्या सुगम संगीतात पार पडला, या सोहळ्याला माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र माननीय श्री वामनरावजी कासावार माजी आमदार वनी विधानसभा क्षेत्र माननीय श्री संजीव रेड्डी बोदकुरवार माजी आमदार वनी विधानसभा क्षेत्र माननीय सौ किरण ताई देरकर अध्यक्ष महिला बँक वनी माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे अध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव माननीय सौ अरुणाताई खंडाळकर माजी सभापती महिला व बालकल्याण जि प यवतमाळ माननीय श्री आशिष भाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वनी माननीय श्री देविदास जी काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था वनी माननीय श्री गौरीशंकर खुराना सभापती कृषी उत्पन्न बाजार मारेगाव माननीय श्री भास्करराव ढवस माजी सदस्य जि प यवतमाळ माननीय श्री मुकेश जी जीवतोडे शिवसेना नेते वरोरा माननीय श्री संजय भाऊ खाडे वसंत जीनिग संचालक वनी,माननीय श्री राजुभाऊ कासावार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी,तिकाराम कोंगरे माजी अध्यक्ष य.जी.म य बँक यवतमाळ
गुरुकुंज आश्रम मोझरी येथून सर्वाधिकारी श्री लक्ष्मणजी गमे सर ,जिल्हा गुरुदेव प्रचारक श्री रुपलालजी कावळे सर,श्री ईश्वर पाटील घानोडे दादा ,ह भ प कीर्तनकार गुणवंत दादा कुत्तरमारे,ग्रामगीता परीक्षा विभाग तालुका प्रमुख श्री विशालजी गावंडे सर , गुरुदेव प्रचारक श्री गजानन दादा डंभारे ह.भ.प कीर्तनकार सुवर्णा ताई पिंपळकर व गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत पाहुणे उपस्थित होते .वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विवाह संस्कार या अध्याया मध्ये विवाहाची व्याख्या खूप सुंदर करतात ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती,चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा,स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । जरि परस्पर सहायकें । तरीच संसाररथ चाले कौतुकें । ग्राम होई आदर्श ,या विवाह सोहळ्यानंतर आर्या कुत्तरमारे हिने राष्ट्रवंदना घेतली विवाह सोहळ्यात येणाऱ्या उपस्थित प्रत्येक पाहुण्यांचे आदरतिथ्य ग्रामगीता व संविधान देऊन या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला .
0 comments:
Post a Comment